Urdu Books Apps
Standard First
Standard Second
Standard Third
Standard Fourth
Standard Fifth
Standard Sixth
Standard Seventh
Standard Eighth
with Special Sameer Syed Sir
Details of this app
महाराष्ट्र राज्यातील उर्दू माध्यमाच्या विद्यार्थी,शिक्षक,पालक सर्वांसाठी उपयुक्त अशी Android App
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱
इयत्ता :- पहिली ते आठवी
माध्यम :- उर्दू
किंमत :- मोफत
इंटरनेट ची आवश्यकता :- नाही
कोणत्या device मध्ये run होणार :- सर्व Android device , Laptop/computer
--------------------------
शासनाचे धोरण दप्तराचे ओझे कमी करणे या महत्वपूर्ण निर्णय च्या अनुसंगाने आपण काय करू शकतो हा विचार अनेक दिवसांपासून मनात होते. "दप्तर विना शाळा" या विषयी अनेक उपक्रम राबविण्यात आले. मग यापेक्षा काहीतरी वेगळे करायचे हे ठरविले.
या कामासाठी माझे प्रेरणास्थान आपल्या राज्याचे प्रधान सचिव मा.श्री.नंदकुमार साहेब व आमच्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री अनिल कुलकर्णी साहेब आहेत,
या app चा उद्देश असा की महाराष्ट्रातील उर्दू माध्यमाच्या सर्व विद्यार्थी ,शिक्षक,पालक यांना पाठय पुस्तक सहज उपलब्ध होईल,सहज हाताळता येईल, गुणवत्ता वाढण्यास मदत,व सर्वांना फायदा होईल असा आहे.
सदर विषयी माझे प्रयत्न जून 2016 पासून सुरु होते, प्रथम इयत्ता 1 ते 8 उर्दू माध्यम च्या सर्व पुस्तक scan करून घेतले pdf स्वरूपात save करून घेतले.
साधारणतः 500mb चा data तयार झाला
या नंतर त्याचे android app मध्ये रूपांतर केले. प्रत्येक इयत्ते साठी स्वतंत्र app तयार केले.
सुरुवातीस अनेक चुका झाल्या परंतु "चुका आणि शिका" हा तंत्र वापरला. हे काम पूर्ण करण्यासाठी मला श्रीम अंजुम शेख (राज्यस्तरीय महिला तंत्रस्नेही शिक्षिका) माझे मित्र श्री संतोष केंद्रे (रायगड) व श्री नागनाथ विभूते (पुणे) यांनी सहकार्य केले.
सध्या हे apps माझ्या Google Drive वर अपलोड केले आहेत, त्याची लिंक व्हाट्सअप्प,Email, Blog, Facebook किंवा sms च्या माध्यमातून सम्पूर्ण महाराष्ट्रात share करता येते.
वापरकरत्याने फक्त त्या लिंक वर क्लिक केल्यास हि app त्यांच्या device मध्ये download होते. Install केल्यावर फक्त एका क्लिक वर एका इयत्तेचे सर्व विषयाचे सम्पूर्ण पाठय पुस्तक open होतात.
*माझ्या या App साठी supporting App WPS OFFICE असणे आवश्यक आहे,व हे PLAYSTORE वर मोफत उपलब्ध आहे,
फायदा
हे APP वापरल्याने विद्यार्थीचे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल.
शिक्षकांना पाठाची पूर्व तयारी करण्यास मदत होईल
DIGITAL SCHOOL PROJECT साठी उपयुक्त
प्रोजेक्टर वर लावल्यास मुलांना पुस्तक मोठ्या रुपात दिसेल मुलांना आकर्षण वाढेल
सुट्टीच्या वेळेस विद्यार्थी कुठेही प्रवासात आपल्या नातेवाईक कडे गेल्यास उपयुक्त
हाताळणे सहज आणि सोपे असल्याने सर्व विद्यार्थ्यांना वापरणे सोपे होईल
पालक आणि विद्यार्थी आंतरक्रिया वाढेल पालक विद्यार्थी चा अभ्यास घेण्यात एक नवीन अनुभव घेतील
गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.
असे हे माझे छोटे से प्रयत्न आहेत
सदरकर्ता : समीर रब्बानी काजी सय्यद
उपशिक्षक
राजिप शाळा आरावी उर्दू
तालुका श्रीवर्धन
जिल्हा रायगड
8983790197
No comments:
Post a Comment